CIDCO New Update Today, सिडको भरती बाबतची नवीन सूचना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिडको सहाय्यक अभियंता – स्थापत्य या पदाच्या जाहिराती बद्दल नवीन सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांनी खाली दिलेली सूचना वाचून घ्यायची आहे तसेच अर्ज केलेल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. CIDCO New Update Today, सिडको भरती बाबतची नवीन सूचना, cidco bharti 2024 apply online,

सिडको महामंडळ मार्फत 18 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक अभियंता साठी पदभरती जाहिरात दिली होती. 15 मार्च 2024 या दिवशी शुद्धीपत्रक मार्फत पदांच्या आरक्षणामध्ये बदल केला असल्याचे सांगितले गेले होते.

CIDCO New Update Today

10 जुलै 2024 रोजी दिलेल्या सूचनेप्रमाणे ओबीसी / ई डब्ल्यू एस आणि ओपन उमेदवारांना त्यानंच प्रवर्ग बदलून एस ई बी सी प्रवर्ग मध्ये अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली होती.

तसेच नवीन अर्ज सादर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना व अगोदर अर्ज केलेय उमेदवारांना इतर प्रवर्ग मधून अर्ज करायचा असल्यास लिंक सिडको च्या वेबसाइट वर उपलब्ध करून दिली जाईल असे सांगण्यात आले होते.

  • या अगोदर अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांना प्रवर्ग बदलायचा आहे. त्या उमेदवारांना नवीन अर्ज करायला लागेल.
  • जसे की ओबीसी मधून अर्ज केला असल्यास त्यांना प्रवर्ग बदलून एस ई बी सी मधून अर्ज करायचा असल्यास उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या लिंक वरून अर्ज करता येणार आहे.
  • उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या मुदती मध्ये अर्ज करायचा आहे.
  • खाली गोष्टींची नोंद घ्या :
    • नवीन अर्ज करताना उमेदवारांना नवीन परीक्षा फी भरावी लागेल. अगोदर भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
    • एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांच्या सर्व अर्जापैकी त्यांनी फी भरून सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य करण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या लिंक वरून दिलेल्या मुदती मध्ये अर्ज सादर करायचा आहे.
  • जाहिरात आणि शुद्धीपत्रक पाहण्यासाठी www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाइट ला भेट द्या.

सिडको नवीन अधिकृत सूचना : येथे क्लिक करा