Dhangar Cast Scholarship 2024, धनगर जातीसाठी योजना नवीन योजना

आपण आज राज्य शासनाने धनगर समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा आणि तुमच्या धनगर समाजातील मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. Dhangar Cast Scholarship 2024, धनगर जातीसाठी योजना नवीन योजना 2024, धनगर शिष्यवृत्ती 2024, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, शैक्षणिक योजना 2024.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना राबविण्यासाठी मान्यता दिलेली आहे. स्वतंत्र स्वयंम योजना या नावाने ही योजना सुरू राबविली जाणार आहे. शैक्षणिक उच्छता मिळवण्यासाठी धनगर समाजातील उमेदवारांना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.

सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी खाली लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

Dhangar Cast Scholarship 2024

राज्य सरकार तर्फे धनगर जातीमधील विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच योजना सुरू करण्यात आलेली आहे. बारावी झाल्यानंतर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर या ठिकाणी चांगले उच्च शिक्षण करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना प्रत्येक वर्षाला 60 हजार रुपये दिले जातील.

“क” वर्ग महापालिकेच्या क्षेत्रात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना 51 हजार आणि बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना 43 हजार मिळतील. वसतिगृह योजनेतून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्याना ह्या योजनेचा लाभ मिळणार.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग तर्फे ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्य शासन ही शिष्यवृत्ती काही अटी आणि शर्ती नुसार राबविणार आहे. 2024-25 या वर्षापासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

स्वतंत्र स्वयंम योजना 2024 अटी आणि शर्ती

  1. अर्जदार धनगर समाजातील असावा.
  2. अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे.
  3. ज्या शहरात शैक्षणिक प्रवेश घेतला आहे. त्या शहर मधील रहिवासी असावा,
  4. बारावी परीक्षेमध्ये कमीत कमी 60% मार्क असावे.
  5. ज्या अभ्यासक्रम साठी प्रवेश घेतलेला आहे. तो दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  6. उमेदवाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

वरील योजना तुमच्या धनगर समाजातील मित्र मैत्रिणींना शेअर करा.