Rashtriya Kutumb Labh Yojana 2025, सरकारी योजना 2025

आजच्या लेखात आपण एका आर्थिक सहाय्य देणाऱ्या सरकारी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आज आपण या योजनेचे फायदे / उद्देश आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर पाहणार आहोत. Rashtriya Kutumb Labh Yojana Mahrashtra 2025, सरकारी योजना 2025, राष्ट्रीय कुटुंब योजना माहिती मराठी 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या नावाने सुरू करण्यात आलेली आहे. गरीब कुटुंबांना अर्थ मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत ही योजना राबविली जातात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ही या योजनेचे लाभरी लाभार्थी असणार आहे.

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra काय आहे ?

राज्यात आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांमधील 18 – 59 वय असणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाचा अपघात होऊन किंवा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 20 हजार रुपये एवढी आर्थिक मदत करण्यात येते.

गरीब कुटुंबामध्ये सर्व कुटुंबाची जबाबदारी कमवून आणणाऱ्या व्यक्तीवर असते. अशा व्यक्तीचा जर मृत्यू जल तर त्या त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या सगळ्याचा विचार करून महाराष्ट्र सरकार तर्फे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2025 आर्थिक मदत

कुटुंबामधील घर सांभाळण्याऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाला 20,000 /- रु एवढी आर्थिक मदत देण्यात येते.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2025 साठी कोण पात्र आहे ?

  1. अर्जदार व्यक्ति दारिद्र्य रेषेतील कुटुंबामधील असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तिचे वय 18 – 59 च्या दरम्यान असावे.
  2. अर्ज करणारी व्यक्ति मृत व्यक्तीच्या घरातील किंवा मृत असणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असणे गरजेचे आहे.

योजनेच्या अटी व शर्ती :

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
कुटुंब प्रमुख व्यक्ति चा आत्महत्या करून मृत्यू झालेला असल्यास त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असावे. दारिद्र्य रेषेच्या अंतर्गत नसलेल्या कुटुंबांसाठी ही योजना नाही
कुटुंबातील कमवत असणारी व्यक्ति मृत झाल्याच्या तारखेपासून 3 वर्षाच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2025 अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे जावे. तिथून अर्जाची प्रत घ्यावी.

अर्जात नमूद असणारी सर्व माहिती अचूक भरावी आणि सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.

भरलेला अर्ज ज्या संबंधित कार्यालयात जमा करावा. अर्ज जमा केल्याची पावती तिथून घ्या.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करा. अर्ज करताना मुदतीची शहनिशा करा.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र

  1. नमुन्यातील अर्ज
  2. तलाठी यांचा पंचनामा अहवाल / जबाब
  3. मृत्यू चा दाखला
  4. वयाचा पुरावा / मृत्यू ची नोंद असलेल्या पानाची प्रत
  5. रहिवासी दाखला
  6. आधार कार्ड
  7. रेशनकार्ड
  8. निवडणूक ओळखपत्र
  9. अर्जदार व्यक्तीचा फोटो
  10. बँकेचे पासबुक झेरॉक्स

या योजनेचा अर्ज कुठे करायचा ?

  1. तहसील किंवा सेतु कार्यालय
  2. अर्ज लिंक : येथे क्लिक करा
  3. अधिकृत योजना जाहिरात : येथे क्लिक करा
  4. अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करा