WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vanrakshak Bharti 2023,Vanvibhag Bharti 2023 वनरक्षक भरती 2023

Vanrakshak Bharti 2023

Vanrakshak Bharti 2023

Vanrakshak Bharti 2023 वन विभागतील वनरक्षक ची पदे (गट – क) सरळसेवेने भरणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज पद्धत ही ऑनलाइन असेल. https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाइट चा वापर करून अर्ज भरायचा आहे. 2138 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या पोर्टलवर खालील लेखात सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात दिलेली आहे सविस्तर माहिती वाचा.

marathivacancy.com या वेबसाइट वर पोलिस भरती, वन विभाग भरती, कृषि विभाग भरती, मंत्रालय भरती, क्लर्क भरती, स्टेनोग्राफर भरती, लिपिक भरती, निरीक्षक -उपनिरीक्षक भरती, रेल्वे विभाग भरती, शिक्षक भरती, बँक भरती, जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, मेट्रो कॉर्पोरेशन भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती, बांधकाम विभाग भरती, जलसंपदा विभाग भरती अशा इतर सर्व विभागच्या भरती जाहिराती सविस्तर मिळतील. नियमित सविस्तर जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील ही जाहिरात शेअर करा.


वनरक्षक भरती 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 10 जून 2023 रोजी होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 असेल.

वनरक्षक गट क साठी पगार :

पगाररिक्त पदे
S-7 नुसार 21700 ते 69100 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर देय भत्ते ( सातव्या वेतन आयोगाप्रमाणे) 2138

शैक्षणिक पात्रता :

 • अर्जदाराने 12 वी विज्ञान,गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र या पैकी एक विषयातून पास केलेली असावी.
 • अनुसूचित जमाती मधील अर्जदाराने 10 वी पास केली असल्यास तो अर्जदार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असेल.
 • माजी सैनिक अर्जदार 10 वी पास असल्यास अर्ज करण्यास पात्र असेल.
 • नक्षल हल्ल्या मरण आलेले किंवा गंभीर जखमी असलेले वनखबरे व वनकर्मचारी याच्या मुलांनी 1 ऑ वी पास केलेली असल्यास ते अर्ज करण्यास पात्र असतील.
  (टीप : नक्षल हल्ल्यात मरण पावलेल्या व जखमी असलेल्या खबरी व वन कर्मचारी या संबंधित शासकिय विंदयकीय अधिकारी आणि पोलिस खतीच्या घटनेतील कार्यक्षेत्रातील सक्षम असलेले अधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्राचा विचार केला जाईल.)
 • अर्ज करण्याच्या शेवटच्या तरखे पर्यंत दिलेली पात्रता मिळवणे आवश्यक आहे.
 • मराठी भाषेतील ज्ञान जसे की लिहिणे, वाचणे, बोलणे गरजेचे आहे.
वयाची अट :
 1. अमागास : 18 ते 27 वर्षे
 2. मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ : 18 ते 32 वर्ष
 3. खेळाडू : 18 ते 32 वर्षे
 4. माजी सैनिक : 1) अमागास : 18 ते 27 वर्षे + सैनिकी सेवेचा वेळ + 3
  2) मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ : 18 ते 32 वर्षे + सैनिकी सेवेचा वेळ + 3
 5. प्रकल्पग्रस्त : 18 ते 45
 6. भूकंप ग्रस्त : 18 ते 45 वर्षे
 7. पदवी असलेला अंशकालीन कर्मचारी : 18 ते 55
 8. रोजावर काम करणारा मजदूर : 18 ते 55

शारीरिक पात्रता :

खालील पात्रता निकष अर्जदारास पूर्ण करावे लागतील.

शारीरिक मोजमापपुरुषमहिला
ऊंची ( से. मी )163 150
छाती ( से. मी )न फुगवता – 79
फुगवून – 84

वजन ( कि. ग्र )ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अर्जदाराने डोळ्या संबंधित नियम व पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

फी : खाली दिल्याप्रमाणे अर्जदारास शुल्क भरावे लागेल.

संवर्गफी
अमागास 1000 /-
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ 900 /-
माजी सैनिक 0

निवड पद्धत :

ऑनलाइन केलेल्या अर्जातील माहिती नुसार पात्र असलेल्या अर्जदारांची महसूल व वन विभाग , शासन निर्णय नंबर एफ एस टी – 06/प्र. क्र.128/फ – 4, तारीख : 27/12/2022 व शासनाच्या अनुषंगाने दिशा निर्देश प्रमाणे निवड करण्यात येईल. इतर माहिती साठी सविस्तर दिलेली जाहिरात वाचा

परीक्षा :

पात्र ठरलेल्या अर्जदारांची 120 मारकांची संप्रधात्मक परीक्षा ऑनलाइन ( टी सी एस . ION ) टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड मार्फत घेतली जाईल. परीक्षेचे मार्क खालील प्रमाणे असतील.

विषय मार्क
मराठी30
इंग्रजी30
सामान्य ज्ञान30
बौद्धिक चाचणी30
 1. ऑनलाइन परीक्षेतील प्रश्न हे माध्यमिक शाळा 10 वी च्या दर्जाचे असतील. सामान्य ज्ञान मध्ये राज्याचा भूगोल, समाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवमान इत्यादि विषयांचा समावेश असेल.
 2. परीक्षा ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ प्रश्न व बहुपर्यायी प्रकारची असेल.
 3. परीक्षेची वेळ 2 तासाची असेल.
 4. अर्जदाराने परीक्षेत कमीत कमी 45% मार्क मिळवणे गरजेचे असेल, किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे अर्जदार गुणवत्तेनुसार पदासाठी पात्र राहतील. 45% पेक्षा कमी मार्क असलेले अर्जदार भरती मधून बाद होतील.

परीक्षेचा निकाल :

ऑनलाइन परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट जाहीर करण्यात येईल. अर्जदाराने अर्ज केलेल्या पदासाठीच त्याचा विचार करण्यात येईल.

Vanrakshak Bharti 2023 महत्वाच्या सूचना

 1. निवड करण्याच्या कुठल्या स्तरावर अयशस्वी ठरलेल्या अर्जदाराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही किंवा लिखित सूचना देण्यात येणार नाही
 2. अर्जदाराने कुठलाही वशिला किंवा गैरप्रकाराचा मार्ग वापरल्यास त्याला अपात्र केले जाईल.
 3. भरती स्थगित करणे =, रद्द करणे, बदल करणे आणि भरती संबंधित तक्रारी व वाद याबाबत निर्णय घेणे, अर्ज रद्द करणे, निवड यादी व प्रतीक्षा यादी ला मान्यता देणे, जाहिरातीनुसार योग्य ते कार्य वाही राबविणे याचे सर्व अधिकार निवड समितीला असतील.
 4. भरती साठी गैरहजर राहिल्यास अर्जदारास अपात्र केले जाईल, व परीक्षा फी परत दिली जाणार नाही.
 5. मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र पडताळणीच्या तारखेला सादर करणे गरजेचे आहे. मूल कागदपत्र नसल्यास अर्जदारास अपात्र केले जाईल.
 6. भरती संपेपर्यंत दिलेला मोबाइल नं आणि ई -मेल बदलू नये व चालू ठेवावेत.
 7. ऑनलाइन अर्ज भरताना अधिकृत जाहिरात व सर्व सूचना वाचूनच भरावा.
 8. खोटी प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या अर्जदारांवर कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाईल. हे लक्षात ठेवावे.
 9. शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी असल्यास व अर्ज भरायचा असल्यास त्यांनी त्यांच्या कार्यालय प्रमुख च्या परवानगी च्या अधीन राहून दिलेल्या मुदतीत भरावा.
 10. जिल्हानिहाय पद संख्या पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात वाचावी.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सविस्तर जाहिराती नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment