सारथी पुणे आणि इंडो जर्मन टूल ( IGTR ) यांच्या मार्फत मराठा / कुणबी / कुणबी – मराठा आणि मराठा – कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटातील तरुण व तरुणींसाठी अनिवासी / पूर्ण वेळ आणि निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज विहित नमुन्यात मागविण्यात आलेले आहेत. Sarthi Free Training 2025, sarthi free training programme 2025, सारथी पुणे मोफत प्रशिक्षण 2025-26,
सदर कौशल्य विकास प्रशिक्षण हे विना शुल्क असणार आहे. तसेच या प्रशिक्षणाचा खर्च हा सारथी पुणे यांच्यातर्फे केला जाणार आहे. अशा सर्व योजनांची माहीत मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.
Sarthi Free Training 2025
प्रशिक्षणासाठी कोणत्या ठिकाणी किती सीट आहेत आणि कोणत्या ट्रेनिंग प्रोग्राम साठी आहेत ही खालील फोटो मध्ये पहा. ( फोटो नीट दिसत नसल्यास तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता )
वरील कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्ण काळाचे असून, हे कौशल्य विकास प्रशिक्षण IGTR Aurangabad या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेमार्फत औरंगाबाद आणि या संस्थेच्या वाळूज औरंगाबाद / पुणे / नागपूर आणि कोल्हापूर या उपकेंद्रात देण्यात येणार आहे.
- हे प्रशिक्षण अनिवासी असणार आहे, प्रशिक्षणाच्या वेळी राहण्याची व जेवणाची सोय उमेदवाराला स्वतच्या खर्चाने करावी लागेल.
- मराठा / कुणबी / कुणबी – मराठा आणि मराठा – कुणबी समाजातील नॉन क्रिमिलेयर गटाच्या 18 टे 35 वयोगटातील गरजू आणि इच्छुक असणाऱ्या व पात्रता असलेल्या ऑनलाइन अर्ज आणि त्याच्या नुसार कागदपत्र सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी निवड कार्यक्रम ठिकाणी मूळ कागदपत्र घेऊन स्वतच्या खर्चाने उपस्थित राहायचे आहे याची नोंद घ्यावी.
- मिळालेल्या अर्जातून निकषांच्या आधारे अर्जाची तपासणी करून निवडलेल्या उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा आणि मुलाखत साठी बोलवले जाणार आहे.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध केली जाईल.
- अर्धवट असणारे किंवा मुदतीच्या नंतर आलेले अर्ज अपात्र ठरविले जातील. ( पात्रता परीक्षा इंग्रजी / गणित आणि सामान्यज्ञान या विषयावर आधारित असेल )
- उमेदवाराने नॉन क्रिमिलेयर किंवा ई डब्ल्यू एस असल्याचे सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.
सारथी पुणे मोफत प्रशिक्षण 2025-26
- ज्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांची जात शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याच्या प्रमानपत्रावरून ग्राह्य धरण्यात येईल.
- उमेदवारांनी निवडलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच त्यांची प्रवेश परीक्षा / मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.
- ज्या उमेदवारांना IGTR औरंगाबाद / पुणे /नागपूर आणि कोल्हापूर याच्यापैकी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यांनी त्या सेंटर च्या खाली असणाऱ्या क्यु आर कोड किंवा संस्थेच्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावे.
- सदर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांची यादी IGTR व सारथी च्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली जाईल.
- प्रशिक्षण सुरू झाल्याच्या नंतर उमेदवाराला गैरहजर राहता येऊ शकत नाही किंवा अर्धवट प्रशिक्षण
एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असल्यास अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी उशीर होऊ शकतो.
अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2024
प्रवेश परीक्षा / कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत तारीख : 31 डिसेंबर 2024
प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख : 6 जानेवारी 2025
Free Training Programme Sarthi Pune 2025
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |