Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna in Marathi 2023

आजच्या माहिती मध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेचा फायदा, पात्रता आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची अचूक माहती आपण घेऊया.Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna in Marathi 2023

इतर योजनांची आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2023 खाली दिलेली माहिती वाचा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची योजना ठरू शकते. ही योजना नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताची आहे. म्हणून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळण्यासाठी महराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. सौर ऊर्जा हा सुद्धा एक उर्जेचा अखंड ऊर्जा स्त्रोत आहे. शेती च्या पाण्यासाठी सौर ऊर्जा ही एक महत्वाची भूमिका पार पडू शकतो. आज आपण या योजेनची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.


मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना माहिती मराठी 2023

योजना : मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

सुरुवात : महाराष्ट्र शासन तर्फे

लाभ घेणारे : महाराष्ट्रातील शेतकरी

अर्ज पद्धत : ऑनलाइन

विभाग : उद्योग व ऊर्जा कामगार विभाग

महाराष्ट्रात महावितरण कंपनी तर्फे मार्च 2017 अखेर 40,68, 220 कृषि पंप साठी लाइट चा पुरवठा केला जात आहे. कृषि ग्राहकांना सरासरी 1.07 प्रती युनिट दर आकारून विजेचा पुरवठा केला जातो.

सर्व कृषि पंप साठी वीज पुरवठा करताना 62 के व्ही ए / 100 के व्ही ए क्षमता असलेले विद्युत रोहित्र बसवले जातात. व त्यातून लघु डब असलेल्या वाहिनी मधून कृषि पंप साठी वीज पुरवली जाते.
लघु दाब वाहिनी ची लंबी वाढल्या कारणाने वीज पुरवठ्यात सतत बिघाड होतात, वीज पुरवण्यात अडथळे येतात. परिणामी वीज पुरवठा खंडित होतो. रोहित्र बिघडणे, वीज चोरी अशा अडचणी निर्माण होतात.

वरील अडचणींना पर्याय म्हणून सौर कृषि पंप वापरण्यास सुरुवात केल्यास वरील अडचणींना बंद करता येऊ शकते. त्याचे फायदे शेतकऱ्यांना मिळतील. त्या साठी राज्यात सौर कृषि पंप योजना राबविण्याचा सरकारचा हेतु आहे.

योजनेची वैशिष्ट्ये :

राज्यातील शेतकरी बांधवांना दिवसा सिंचन करता ये आणि राज्याची कृषि पंप जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात आणि राज्य शासन तर्फे सबसिडी साठी देण्यात येणाऱ्या अनुदान मध्ये बचत व्हावी.
या साठी शेतकऱ्यांना शेतीसाठी 1 लाख सौर कृषि पंप टप्या टप्प्याने देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेला शासनतर्फे मान्यता मिळाली आहे.

ही योजना संपूर्णपणे महाराष्ट्र सरकार ची योजना असेल.

योजनेचे वाटप व आर्थिक भार खालील फोटोप्रमाणे :

mukhyamantri saur krushi pamp yojna 2023 apply

Mukhyamantri Saur Krushi Pump लाभार्थी निवडीचे नियम / निकष : खालील फोटोप्रमाणे

mukhyamantri solar pump yojna 2023 marathi

अर्ज कसा करावा :

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या तिथून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अधिक माहिती साठी आणि अर्ज करण्याच्या इतर माहिती साठी दिलेली पीडीएफ वाचा आणि संकेतस्थळाला भेट द्या.

योजनेची अंमलबजावणी करण्याची कार्य पद्धती :

 1. ही योजना महावितरण तर्फे प्रामुख्याने जिल्हाधिकारी, महाऊर्जा, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग,
  भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा कृषि अधिकारी ई.
  या सर्वांच्या समन्वयाने राबविण्यात येईल.
 2. महावितरण मार्फत या योजनेची प्रसिद्धी होईल.
 3. सौर कृषि पंप साठी शासनातर्फे ठरवले गेलेल्या निकष नुसार व उद्दिष्टे यांच्या मर्यादे मध्ये लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समिती तर्फे करण्यात येईल.
 4. समिती मार्फत शिफारस केलेल्या पात्र लाभार्थी कडून कृषि पंप बसवण्यासाठी गरजेच्या लाभार्थी हिस्सा
  महावितरण च्या संबंधित जिल्हास्तरीय कार्यालय मध्ये जमा करावे.
 5. कृषि पंप चा हमीचा कालावधी हा 5 वर्षाचा आस्वा व सोलर मोडयुल वॉरंटी असणे गरजेचे आहे.
  आवश्यक अटींची या साठी अटींची कंत्राट मध्ये समावेश केला जाईल.
 6. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna in Marathi 2023

महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा https://www.mahadiscom.in/solar/index.html
योजनेच्या माहिती ची जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हेल्प लाइन क्रमांक 1800 102 3435 / 1800 233 3435

सर्व नोकरीच्या जाहिराती आणि योजनांची माहीती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये सामील व्हा

Whatsapp Group