Vanvibhag Stenographer Bharti 2023 वनविभाग भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Vanvibhag Stenographer Bharti 2023

Vanvibhag Stenographer Bharti 2023

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत लघुलेखक ( उच्च श्रेणी ) गट ब/ अराजपत्रित, लघुलेखक ( निम्न श्रेणी ) गट ब / अराजपत्रित, लनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट ब/ अराजपत्रित, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. Vanvibhag Stenographer Bharti 2023

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. https://mahaforest.gov.in/ हे वन विभागाचे अधिकृत संकेतथळ आहे . खालील लेखात भरती ची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज केल्यास उमेदवाराने भरती संपेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून वेळो वेळी माहिती घ्यायची आहे. काही नवीन बदल झाल्यास किंवा करायचे असल्यास संकेतस्थळावरच कळवले जाईल म्हणून अपडेट घेत राहणे गरजेचे आहे.


Applications are invited from eligible candidates. The following article gives complete information about recruitment. Applications for this recruitment will be accepted through online mode only. Applications made in any other mode will not be accepted. After applying, the candidate has to check the official website from time to time until the recruitment is over. If there are any new changes or to be made, they will be notified on the website itself, so it is important to stay updated.


वनविभाग भरती 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2023

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

पदांचा तपशील :

पदाचे नावपद संख्या
लखुलेखक ( उच्च श्रेणी, अराजपत्रित ) गट ब 13
लखुलेखक ( निम्न श्रेणी, अराजपत्रित ) गट ब 23
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य , अराजपत्रित ) गट ब 8
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक ( गट क )5
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक ( गट क )15
अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे

पगार :

  • पद 1 साठी : 44,900 ते 1,42,400 रुपये
  • पद 2 साठी : 41,800 ते 1,32,300 रुपये
  • पद 3 साठी : 38,600 ते 1,22,800 रुपये
  • पद 4 साठी : 38,600 ते 1,22,800 रुपये
  • पद 5 साठी : 25,500 ते 81,100 रुपये

वरील सर्व पदांसाठी जास्तीचा महागाई भत्ता व इतर देय भत्ते असतील सातव्या वेतन आयोगाप्रमाणे

शैक्षणिक पात्रता :

लखुलेखक ( उच्च श्रेणी )

  1. उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास असला पाहिजे.
  2. लखुलेखना चा वेग 120 शब्द प्र मिनिट असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  3. इंग्रजी टंकलेखन कमीत कमी 40 शब्द प्र मिनिट किंवा मराठी टंकलेखन कमीत कमी 30 शब्द प्र मिनिट याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  4. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  5. मराठी भाषा बोलता , लिहिता, वाचता येणे महत्वाचे आहे.

लखुलेखक ( निम्न श्रेणी )

  1. उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास असला पाहिजे.
  2. लखुलेखना चा वेग 100 शब्द प्र मिनिट असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  3. इंग्रजी टंकलेखन कमीत कमी 40 शब्द प्र मिनिट किंवा मराठी टंकलेखन कमीत कमी 30 शब्द प्र मिनिट याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  4. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  5. मराठी भाषा बोलता , लिहिता, वाचता येणे महत्वाचे आहे.

कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट ब

  1. उमेदवाराने शासन मान्य तीन वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य मान्यता मिळलेली कोणतीही पात्रता मिळवणे गरजेचे आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारेखे अगोदरच करावा.
  3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक ( गट क )

  1. उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठ मधू गणित , अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषि अथवा संखीयकी यापैकी विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.

    किंवा

    गणित, अर्थशास्त्र , वाणिज्य, कृषि अथवा सांख्यिकी यापैकी विषयाचे कमीत कमी द्वितीय श्रेणीतील पदवी घेतलेली असावी.
  2. अर्ज शेवटच्या तारेखे अगोदरच करावा.
  3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक ( गट क )

  1. उमेदवाराने गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषि अथवा सांख्यिकी या विषयांची पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारेखे अगोदरच करावा.
  3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

वयाची अट

  1. अमागास : 18 ते 40 वर्षे
  2. मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ . : 18 ते 45 वर्षे
  3. प्राविण्य खेळाडू : 18 ते 45 वर्षे
  4. माजी सैनिक : 18 ते 40 ( 45 ) + सैनिक सेवा कालावधी + 3
  5. दिव्यांग : 18 ते 45 वर्षे
  6. प्रकल्पग्रस्त : 18 ते 45 वर्षे
  7. भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्षे
  8. पदवी असलेला अंशकालीन कर्मचारी : 18 ते 55 वर्षे
  9. रोजाने काम करणारा मजूर : 18 ते 55 वर्षे

परीक्षा फी :

संवर्गफी
अमागास1000/- रुपये
मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग / आ. दु . घ900/- रुपये

माजी सैनिक साठी फी नाही, शासन निर्णय RTA-1079/0/482/XVI – A तारीख 3/7/1980 प्रमाणे परीक्षा फी मधून सूट दिलेली आहे.

जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा लागेल. आणि प्रत्येक पदा साठी वेगळी फी भरावी लागेल. फी पुन्हा परत केली जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा
https://mahaforest.gov.in/

Vanvibhag Stenographer Bharti 2023 अर्ज कसा करावा

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागणार आहे.
  2. परीक्षेसाठी असलेली फी सुद्धा ऑनलाइन भरायची आहे.
  3. अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरताना नोंदणी अधि करून घ्यावी व त्यानंतर अर्ज भरायचा आहे.
  4. अर्ज भरताना आवश्यक टी कागदपत्रे व माहिती लक्षपूर्वक भरावी
  5. अर्धवट माहितीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  6. अर्ज भरण्या संबंधीत इतर सविस्तर माहिती आम्ही दिलेल्या लिंक वरुण अधिकृत जाहिरात वाचा.

ऑनलाइन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. निकालाची तारीख परीक्षेच्या काही कालावधी नंतर सांगितली जाईल

पदांची संख्या व त्यांच्या आरक्षण संदर्भातील तरतुदीची सविस्तर माहिती वाचण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

महत्वाची सूचना

  1. निवडीच्या कुठल्या स्तरावर अपात्र ठरवलेल्या उमेदवारास कुठलाही पत्रव्यवहार किंवा लेखी सूचना दिली जाणार नाही.
  2. उमेदवाराने कुठल्याही प्रकारचा वशिला किंवा गैरप्रकार चा वापर केल्यास त्याला भरतीमधून बाद केले जाईल.
  3. भरती मध्ये बदल करणे किंवा इतर निर्णय घेणे, निवड पद्धतीत बदल करणे इत्यादि चे सर्व अधिकार राज्यस्तरीय निवड समितीला आहेत .
  4. मूळ कागदपत्रे उपलब्ध न केल्यास पडताळणी वेळी उमेदवार अपात्र ठरवला जाईल.
  5. भरतील गैरहजर राहिल्यास उमेदवार भरतीमधून बाद होईल व भरलेली फी सुद्धा परत केली जाणार नाही.
  6. ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  7. खोट कागदपत्रे व प्रमाणपत्रे सादर करणार उमेदवार कायदेशी कारवाईसाठी जबाबदार असेल.
  8. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
WhatsApp group

Leave a comment