कृषि आयुक्तालय कार्यालयाच्या आस्थापनेतील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क वर्गातील लघुटंक लेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघु लेखक(निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या राज्यस्तराच्या वर्गातील रिक्त असलेली पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. Krushi Vibhag Recruitment 2023
कृषि आयुक्तालय व अधिनिस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क वर्गातील वेगवेगळी पदे भरण्यासाठी विज्ञापित केलेल्या जाहिराती नुसार ऑनलाइन अर्ज करण्याच्या जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या वर्गातील पदासाठी अर्ज करता आलेले नाहीत. म्हणून ऑनलाइन अर्ज न करता आलेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी 10 दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
22 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज सुरू आहेत. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार माहीत.
marathivacancy.com ही महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सविस्तर जाहिरात अपडेट मराठी भाषेत तुम्हाला मिळेल. शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, पगार, अर्ज / परीक्षा फी, अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, अर्ज करण्याची पद्धत व अर्ज करण्याच्या सूचना व इतर आवश्यक माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. तसेच पुढील नोकरी अपडेट व नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
दिलेली नोकरी जाहिरात महत्वाची असून इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खाली बाजूस दिलेल्या पर्यायांचा वापर करा
Krushi Vibhag Recruitment 2023 | कृषि विभाग भरती 2023
एकूण जागा : 60 जागा
पदांची नावे :
- लघु टंक लेखक : एकूण 28 जागा
- लघु लेखक (निम्न श्रेणी) : एकूण 29 जागा
- लघु लेखक (उच्च श्रेणी) : एकूण 3 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद | पात्रता |
---|---|
लघु टंकलेखक | 1) माध्यमिक शाळा परीक्षा पास 2) लघु लेखन वेग कमीत कमी 80 शब्द मिनिट व इंग्रजी टंक लेखन वेग कमीत कमी 40 शब्द मिनिट किंवा मराठी टंक लेखनाचा वेग 30 शब्द मिनिटाला या पात्रतेचे शासकीय प्रमाणपत्र |
लघु लेखक ( निम्न श्रेणी ) | 1) माध्यमिक शाळा परीक्षा पास 2) लघु लेखन वेग कमीत कमी 100 शब्द मिनिट व इंग्रजी टंक लेखन वेग कमीत कमी 40 शब्द मिनिट किंवा मराठी टंक लेखनाचा वेग 30 शब्द मिनिटाला या पात्रतेचे शासकीय प्रमाणपत्र |
लघु लेखक ( उच्च श्रेणी ) | 1) माध्यमिक शाळा परीक्षा पास 2) लघु लेखन वेग कमीत कमी 120 शब्द मिनिट व इंग्रजी टंक लेखन वेग कमीत कमी 40 शब्द मिनिट किंवा मराठी टंक लेखनाचा वेग 30 शब्द मिनिटाला या पात्रतेचे शासकीय प्रमाणपत्र |
प्रति महिना पगार :
पद | पदाचा पगार |
---|---|
लघुटंकलेखक | एस-8 : 25,500 ते 81,100 + अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | एस-14 : 38,600 ते 1,22,800 + अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | एस-15 41,800 ते 1,32,300 + अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते |
हे देखील वाचा
नागपूर महानगरपालिका शिक्षक भरती 2023 सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
वय मर्यादा :
- जाहिराती मध्ये दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजीचे विचारात घेण्यात येईल.
- लघुटंकलेखक, लघुलेखल निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या पदांसाठी 18 वर्ष वय असावे आणि जास्तीत जास्त खुल्या वर्गासाठी 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे
- मागास वर्गासाठी 45 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
- अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज दाखल करण्याची शेवट तारीख : 22 जुलै 2023
अर्ज फी :
- अमागास : 720/- रु
- मागासवर्गीय/आ. दु . घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक : 650/- रु
- अर्ज फी ना परतावा असेल
अर्ज करण्याची पद्धत :
- या भरती साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाइट वर जाऊन करू शकतात.
- ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज फी भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेली आहे.
निवड प्रक्रिया :
- जाहिराती मध्ये पात्रता अटी कमी असून , कमीत कमी पात्रता असेलला उमेदवार शिफारशी साठी पात्र नसेल.
- भरतीची पूर्ण प्रक्रिया सेवा प्रवेश नियम अथवा त्यानंतर शासनाकडून करण्यात येणाऱ्या सुधारणा तरतुदी नुसार राबवले जाईल.
अर्ज करण्यासाठी सूचना :
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करा
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा देखील वापर करून शकता, तिथे अर्ज करण्याची लिंक तुम्हाला मिळेल.
- जाहिराती मध्ये दिलेल्या अटी व पात्रता तपासून ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्यामुळे अर्ज करताना कुठल्या पात्रतेबाबतची प्रमाणपत्र जोडणे गरजेचे नाही.
- अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज भरताना चुकल्यास सर्वस्व जबाबदारी उमेदवाराची असेल.
- उमेदवाराचे नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्म दिनांक, मोबाइल क्रमांक, फोटो, सही, पत्र व्यवहाराचा पत्ता ही माहिती सविस्तर द्यावी लागेल.
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात :
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कृषी विभागाची माहिती
The 19th Century witnessed a growing concern to produce more food due to the rising population pressure. Responding to the recommendations of the Famine Commission in 1881, the Agriculture Department was established in 1883. Its primary objective was to assist the rural community in enhancing agricultural productivity. Initially, the Agriculture and Land Records Departments operated jointly until 1907.
In 1922, after observing positive outcomes from earlier attempts to prevent soil erosion during 1915-16, Mr. Kitting, the Agriculture Director at that time, initiated soil conservation efforts. This marked the beginning of focused initiatives to preserve soil and enhance sustainable agricultural practices.
लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे 19व्या शतकात अधिक अन्न पिकवण्याची गरज भासू लागली. दुष्काळ आयोगाच्या (1881) शिफारशीनुसार, 1883 मध्ये कृषी विभागाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण समुदायाला कृषी क्षेत्रात उच्च उत्पादकता मिळविण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने काम सुरू झाले. 1907 पर्यंत कृषी आणि भूमी अभिलेख विभाग एकत्र कार्यरत होते. 1915-16 मध्ये मातीची हानी थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे उत्साहवर्धक परिणाम मिळाल्यानंतर, तत्कालीन कृषी संचालक श्रीमान किटिंग यांनी 1922 पासून मृदसंधारणाचे काम सुरू केले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या सरकारी व खाजगी नोकरीचे जाहिरात अपडेट त्वरित व सविस्तर मराठी भाषेत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज ला क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला क्लिक करा