अमरावती जिल्हा परिषद बद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. Zp Amravati Recruitment 2023
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहे. म्हणून उमेदवारांनी एकाच पदासाठी इतर जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये.Zp Amravati Recruitment 2023 / Amravati Zp Bharti.
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट-क संवर्गातील पदे विविध भागाकडील सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. नोकरीच्या अनुषंगाने दिलेली भरती जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा.
जिल्हा परिषद अमरावती गट-क भरती 2023 Zp Amravati Recruitment 2023
एकूण पदांची संख्या : 653 पदे
पदांची नावे व पद संख्या :
पदांची नावे | पदांची संख्या |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | 1 |
आरोग्य सेवक (पुरुष) 40% | 14 |
आरोग्य सेवक (पुरुष) 50% | 79 |
आरोग्य सेवक (महिला) | 304 |
औषध निर्माण अधिकारी | 28 |
कंत्राटी ग्रामसेवक | 67 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा. पा. पू.) | 59 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 2 |
कनिष्ठ आरेखक | 3 |
कनिष्ठ यांत्रिकी | 1 |
कनिष्ठ लेखाधिकारी | 1 |
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) | 18 |
कनिष्ठ सहाय्यक लेखा | 5 |
जोडारी | 1 |
पर्यवेक्षिका | 8 |
पशुधन पर्यवेक्षक | 11 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 2 |
यांत्रिकी | 1 |
रिगमन (दोरखंड वाला) | 1 |
वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) | 3 |
वरिष्ठ सहाय्यक लेखा | 2 |
विस्तार अधिकारी (कृषि) | 2 |
विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग 3 श्रेणी 2 | 7 |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | 3 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) | 30 |
Zp Amravati Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
पद क्र | पदाची नावे | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | आरोग्य पर्यवेक्षक | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली आहे आणि ज्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
2 | आरोग्य सेवक (पुरुष) ४०% | विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा १२ महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक राहील. |
3 | आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) | विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा अनुभव धारकाना प्राधान्य देण्यात येईल. अधिकृत जाहिरात वाचा |
4 | आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) ) | ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यक प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा आशा नोंदणीसाठी जे पात्र असतील. |
5 | औषध निर्माण अधिकारी | औषध निर्माण शास्त्रातील पदवी मिळाली असेल आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
6 | कंत्राटी ग्रामसेवक | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य पात्रता परीक्षेत कमीत कमी ६०% गुण मिळाले पाहिजे. किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी किंवा शासन मान्य संस्थेची समजकल्याणाची पदवी (बी एस डब्ल्यू ) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास. जाहिरात वाचा |
7 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा तुल्य पात्रता धारण करत असतील असे उमेदवार. |
8 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा तुल्य पात्रता धारण करत असतील असे उमेदवार. |
9 | कनिष्ठ आरेखक | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र पास. शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असावा. |
10 | कनिष्ठ यांत्रिक | तांत्रिक शिक्षण विभागच्या यांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा पूर्ण जाहिरात वाचा. |
11 | कनिष्ठ लेखा अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व कुठल्याही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अनखंड सेवा केलेला अनुभव अशा उमेदवारांतून नाम निर्देशद्वारे नेमणूक केली जाईल. |
पूढील शैक्षणिक पात्रता खालील फोटो मध्ये दिली आहे.
हे देखील वाचा
स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर 1207 जागांची भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
पगार प्रति महिना :
16,000 पासून 1 लाखाच्या पुढे ( सर्व पदांचा पगार वेगवेगळा आहे. सविस्तर अधिकृत जाहिरात वाचा)
वयमर्यादा :
- खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय :18 ते 43 वर्ष
फी :
- खुला वर्ग : 1000/- रु
- मागास वर्ग : 900/- रु
नोकरी ठिकाण : अमरावती
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा.
प्रक्रिया | महत्वाच्या तारखा |
---|---|
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 ऑगस्ट 2023 |
अर्ज करण्याची शेवट तारीख | 25 ऑगस्ट 2023 |
अर्ज फी भरण्याची शेवट मुदत | 25 ऑगस्ट 2023 |
प्रवेशपत्र मिळण्याची तारीख | परीक्षा होण्याच्या 7 दिवस आधी |
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना :
- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने केला जाईल.
- अर्ज भरताना आवश्यक टी कागदपत्रे अचूक व काळजीपूर्वक अपलोड करावीत,
- अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज फी भरताना ऑनलाइन च भरली जाईल.
- अर्ज भरताना सर माहिती अचूक् नमूद करावी
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या नवनवीन नोकरी जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.