Majhi Kanya Bhagyashree Yojna माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म

Majhi Kanya Bhagyashree Yojna माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म

Majhi Kanya Bhagyashree Yojna Maharashtra 2023 माझी कन्या भाग्यश्री ऑनलाइन अर्ज कसा / मुलींसाठी सरकारी योजना/राज्य सरकार तर्फे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. त्यानुसार महाराष्ट्रातील मुलींसाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत मुलींसाठीचे शिक्षण व आरोग्य यात सुधारणा करणे व मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुधारणा करणे, मुलींच्या जन्माच्या बाबतीत असलेले समाजातील नकारात्मक विचार काढून सकरात्मकता तयार करणे इत्यादि हेतु आहेत. 1 जानेवारी 2014 पासून जन्म होणाऱ्या मुलींसाठी ही योजना लागू केली गेली. Majhi Kanya Bhagyashree Yojna /माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 बद्दल सविस्तर माहिती खालीप्रमाणे देत आहोत. लाभ घेण्यासाठी दिलेली माहिती सविस्तर वाचा.

लाभार्थी प्रकार – 1एकुलती एक मुलगी असेल व आईने कुटुंब नियोजन केले आहे.
लाभार्थी प्रकार – 2एक मुलगी आहे आणि आईने दुसऱ्या मुली नंतर कुटुंब नियोजन केले आहे. अशा वेळी दोनही मुलींना प्रकार 2 चे लाभ मिळतील. परंतु एक मुलगा व मुलगी असल्यास लाभ मिळणार नाही.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 बद्दल सविस्तर माहिती / Majhi Kanya Bhagyashree Yojna

योजेनचे नाव : माझी कन्या भाग्यश्री योजना

सुरुवात : महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

लाभ घेणारे : राज्यातील मुली

योजनेचा हेतु : मुलींना भविष्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणे

योजना विभाग : महिला व बाल विकास विभाग

मुलींसाठी ची ही योजना 1 एप्रिल 2016 पासून महाराष्ट्र राज्यात अखेरची सुरू झाली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या सर्व कुटुंब मध्ये जन्माला येणाऱ्या दोन मुलींकरिता ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेच्या वरील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी देखील या योजनेतून काही लाभ देऊ केला जाणार आहे.

1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला रुपये 7.50 लाख आहे अशा सर्व नागरिकांसाठी लागू केली गेली आहे. या योजने मध्ये ज्या पालकांनी एक मुलगी जन्मल्या नंतर एक वर्षाच्या अंत मध्ये कुटुंब नियोजन केलेल आहे, त्या कुटुंबातील मुलीच्या नावे रुपये 50,000 सरकार तर्फे बँकेत जमा करण्यात येईल. तसेच पालकांनी दुसरी मुलगी जन्मल्या नंतर कुटुंब नियोजन केलेल असेल तर दोन्ही मुलींच्या नावाने 25,000 रु प्रत्येकी बँकेत जमा करण्यात येतील. या प्रमाणे माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका व्यक्तीच्या फक्त 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. प्रशासनाच्या नवीन नियमानुसार योजनेच्या वर्षाच्या उत्पन्नाची मर्यादा 1 लाख असताना ती वाढवण्यात येऊन 7.5 लाख रु केलेली आहे. तसेच मुलीचे 18 वर्ष पूर्ण hoiपर्यंत या योजनेचा अधिकचा लाभ देण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojna योजनेची महत्वाची उद्दिष्टे

 1. लिंग निवडीसाठी प्रतिबंध करणे
 2. मुलींच्या जन्म संबंधी सकारात्मकता निर्माण करणे.
 3. मुलींचा जन्माचा दर वाढवणे
 4. समाजात मुलींना समान दर्जा मिळवून देणे
 5. शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देणे

योजेनेसाठी पात्रता आणि नियम :

 • सुकन्या योजना ही योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे.
 • सुकन्या योजनेच्या अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेस लागू असतील.
 • सुकन्या योजनेतील मुलीनं माझी कन्या भाग्यश्री योजनेत समाविष्ट केले गेले आहे.
 • या योजने साठी अर्ज करताना पालकांनी कुटुंब नियोजनाचा दाखला देणे गरजेचे आहे.
  लाभार्थी चे वडील महराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्ज करताना मुलीचे जन्म झालेले नोंदणी पत्र दाखल करावे.
 • पालकांना एक वेळी जर दोन जुळ्या मुली झालेल्या असतील तरी ते या योजनेस पात्र असतील.
 • विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच मुलीने 10 वी ची परीक्षा पास होणे व 18 वर्ष होईपर्यंत अविवाहित असणे गरजेचे आहे.
 • अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा व इतरांना शेअर करा.

लागणारी महत्वाची कागदपत्र :

 1. मुलीचे वडील महराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत, रहिवासी प्रमाणपत्र
 2. एका मुलीनंतर शस्त्र क्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 3. दोन मुलींच्या नंतर शस्त्र क्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 4. अर्ज करणाऱ्यांचे आधार कार्ड
 5. BPL रेशन कार्ड
 6. मिळकत चे प्रमाणपत्र
 7. मोबाइल क्रमांक
 8. मुलीचे आणि आईचे बँकेचे पासबुक
 9. पासपोर्ट फोटो

योजनेची अधिकृत जाहिरातवाचण्यासाठी क्लिक करा
योजना अर्ज पीडीएफअर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळभेट देण्यासाठी क्लिक करा
योजना व नोकरी साठी वेबसाइटयेथे क्लिक करा

अर्ज कसा करावा,खालील फोटो मध्ये दिल्याप्रमाणे :

Majhi Kanya Bhagyashree Yojna माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म
Majhi Kanya Bhagyashree Yojna माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म

महाराष्ट्रातील सर्व नोकरी व सरकारी योजनांचे सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment