UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023
सूचना : https://marathivacancy.com हे नोकरी संदर्भातील पोर्टअसून आम्ही सरकारी व खाजगी नोकरीचे सर्व अपडेट आमच्या पोर्टल वर देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या नोकरी अपडेट व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी शेवटी लिंक दिली आहे त्यावरून जॉइन करू शकता. नोकरी संदर्भातील माहिती इतराना देखील शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची हक्काची नोकरी मिळेल. अजून एक संदेश तुमच्या सर्वांना असा आहे की तरुण मूल मुलीनी कौशल्य शिकण्यावर आणि शिक्षण घेण्यावर भर हक्काची नोकरी मिळेल असे शिक्षण घ्या .केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Recruitment 2023) वरिष्ठ फार्म व्यवस्थापक, केबिन सुरक्षा निरीक्षक, मुख्य ग्रंथपाक, वाज्ञानिक, विशेषज्ञ, सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ , सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि GDMO पदांसाठी New UPSC Recruitment https://marathivacancy.com
Notice : https://marathivacancy.com is a job related portal and we are trying to provide all govt. and private job updates on our portal.
You can join our WhatsApp group from the link given at the end. Also share job related information with others so that a needy person gets his rightful job.
One more message to all of you is that youth should focus on learning skills an getting education to get right job.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2023
रिक्त जागा : 285
पदांची माहिती :
पद नं | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सिनियर फार्म मॅनेजर | 01 |
2 | केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर | 20 |
3 | हेड लायब्ररियन | 01 |
4 | सायंटिस्ट – B | 07 |
5 | स्पेशालिस्ट ग्रेड III ( Ophthalmology) | 10 |
6 | स्पेशालिस्ट ग्रेड III ( Psychiatry) | 03 |
7 | असिस्टंट केमिस्ट | 03 |
8 | असिस्टंट लेबर कमिशन | 01 |
9 | मेडिकल ऑफिसर | 234 |
10 | GDMO ( होमिओपॅथी) | 05 |
शैक्षणिक पात्रता :
- पद 1 साठी : एम एस सी (फलोत्पादन/शेती), 3 वर्षे अनुभव
- पद 2 साठी : 12 वी उत्तीर्ण, 10 वर्षे अनुभव
- पद 3 साठी : पदवीधर, ग्रंथालय विज्ञान मध्ये, 5 वर्षे अनुभव
- पद 4 साठी एम एस सी ( झुलॉजी ), 3 वर्षे अनुभव
- पद 5 साठी : MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, 3 वर्षे अनुभव
- पद 6 साठी : MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, 3 वर्षे अनुभव
- पद 7 साठी : एमएस सी, (रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/अजैविक रसायनशास्त्र/विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/कृषि रासीयांशस्त्र आणि मृदा विज्ञान ), 2 वर्षे अनुभव
- पद 8 साठी : सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कर्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा LLB, 2 वर्षे अनुभव
- पद 9 साठी : MBBS, रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण
- पद 10 साठी : होमिओपॅथी पदवी
वयोमार्यादा : 1 जून 2023 रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
- पद 1,3,4,8 & 10 : 35 वर्षांपर्यंत
- पद 2,5 & 6 : 40 वर्षांपर्यंत
- पद 7 : 30 वर्षापर्यंत
- पद 9 : 32 वर्षापर्यंत
नोकरी स्थळ : भारत
फी : General/OBC/EWS : 25/- (SC/ST/PH/महिला : फी नाही )
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2023
अधिकृत वेबसाइट : पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा
UPSC भरती बद्दल माहिती
यू पी एस सी किंवा संघ लोकसेवा आयोग, भारत सरकारच्या नागरी सेवांमध्ये विविध पदांवर भरतीसाठी विवीध स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करते.
खाली भरती (Bharti) बद्दल काही सामान्य माहिती दिली आहे.UPSC विविध पदांसाठी भरती आयोजित करते जसे की भारतीय प्रशासकीय सेवा (आय ए एस ), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय वन सेवा (आय एफ एस ) आणि इतर गट अ आणि गट ब पदे. या भरतीसाठी पत्रेता ही अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असते. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. अर्ज केलेल्या पदावर वयोमार्यादा देखील वेगवेगळी असते. या भरती ची निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते. प्राथमिक परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात आणि जे उमेदवार प्राथमिक परीक्षा पास होतात त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलवले जाते. मुख्य परीक्षेत लेखी चाचणी आणि त्यानंतर मुलाखत असते. इच्छुक उमेदवार UPSC भरतीसाठी अधिकृत वेबसाइट वरुन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी असलेली फी उमेदवार सर्व ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
प्राथमिक परीक्षेचे प्रवेशपत्र हे अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला जात असताना हे प्रवेशपत्रची प्रिंट सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.
प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेचे निकल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातात. आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी साठी बोलवले जाते.
नागरी सेवा परीक्षा आयोजित करण्याव्यतिरिक्त , UPSC इतर विविध पदांसाठी देखील भरती करते, जसे की , अभियांत्रिकी सेवा परीक्षा, एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा. या परीक्षांसाठी पात्रता निकष,निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया भिन्न असू शकतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा इतिहास
ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखालील भारतातील नागरी सेवेत नामनिर्देशित अधिकारी लंडनमध्ये प्रशिक्षित होते आणि त्यांना भारतात पाठवले जात असे. 1854 मध्ये, भारतीय नागरी सेवा (ICS) साठी स्पर्धात्मक परीक्षांसह गुणवत्ता-आधारित प्रणाली सुरू करण्यात आली. परीक्षेला सुरुवातीला युरोपियन क्लासिक्सची पसंती मिळाली, त्यामुळे भारतीय उमेदवारांसाठी ते आव्हानात्मक बनले. 1864 मध्ये, श्री सत्येंद्रनाथ टागोर हे यशस्वी होणारे पहिले भारतीय बनले. भारतीय उमेदवारांनी स्थानिक परीक्षांसाठी याचिका करणे सुरूच ठेवले, ज्या शेवटी WWI नंतर सुरू झाल्या. भारतीय नागरी सेवा परीक्षा 1922 मध्ये भारतात सुरू झाली.
इम्पीरियल पोलिसांसाठी खुली स्पर्धा 1893 मध्ये सुरू झाली, परंतु योग्य युरोपियन उमेदवारांच्या अभावामुळे 1939 पर्यंत भारतीयीकरण मंद होते.
इम्पीरियल फॉरेस्ट सर्व्हिस 1867 मध्ये तयार करण्यात आली आणि 1905 पर्यंत अधिकाऱ्यांना युरोपमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर, 1966 मध्ये भारतीय वन सेवेची स्थापना करण्यात आली.
भारतातील लोकसेवा आयोगाची स्थापना 1926 मध्ये करण्यात आली, 1937 मध्ये ते फेडरल लोकसेवा आयोग बनले. 1950 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते संघ लोकसेवा आयोग बनले.
नियमित सर्व नोकर भरतीच्या जाहिराती तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप ला जॉइन व्हा.
माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुमच्या मित्रांना,मैत्रिणीना नक्की शेअर करा.