Ahmednagar Anganwadi Bharti 2023 : 12th Bharti 2023

Ahmednagar Anganwadi Bharti 2023

Ahmednagar Anganwadi Bharti 2023 अहमदनगर अंगणवाडी भरती 2023, 12th Bharti 2023/ 12 वी पास भरती 2023

अहमदनगर जिल्हा अंगणवाडी मदतनीस भरती सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. एकूण 137 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Ahmednagar Anganwadi Bharti 2023

खालील लेखात शैक्षणिक पात्रता, फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याचा पत्ता, वय मर्यादा, नोकरी ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. मगच अर्ज करा. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अहमदनगर पूर्व, पश्चिम आणि शहरी विभागासाठी जाहिरात आलेली आहे. दिलेल्या तिन्ही जाहिराती तुमच्या असलेल्या विभागानुसार पाहून घ्या.

https://marathivacancy.com/ ही एक नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात अपडेट तुम्हाला मिळतील. नियमित अपडेट साठी आमच्या वेबसाइट शो जोडून राहा आणि खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच दिलेली जाहिरात गरजू महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काची छोटीशी नोकरी मिळेल.

https://marathivacancy.com/ is a job update website. On this website you will find every government and private job advertisement updates in Maharashtra. For regular updates stay tuned to our website and Join the WhatsApp group From given link. Also Share the given recruitment information to needy women so that they get their rightful small jobs.


Ahmednagar Anganwadi Bharti 2023

एकूण : 137 जागा

पद : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पगार : 5,500/- रु ते 7200/- रु

वय मर्यादा : 18 ते 35 (विधवा महिला उमेदवार : 40 वर्षे )

फी : फी नाही

नोकरी ठिकाण : अहमदनगर (पश्चिम,पूर्व आणि शहर)

अर्जाची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : विभागानुसार पत्ता खालील माहिती मध्ये हायलाइट केलेला आहे.

अर्ज पाठवण्याची शेवट तारीख : 10 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ (website) : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे त्या आधी सर्व माहिती सविस्तर वाचा.



बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पश्चिम विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती 2023

महाराष्ट्र शासन, निर्णय नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पश्चिम या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, पारनेर व अकोले शहरातील नगर पालिका / नगर पंचायत भागातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यंत जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज मागवण्यात आलेले आहेत. दिलेल्या जाहिरातीतील किंवा दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्जाचा नमूना डाउनलोड करून घ्यावा व पूर्ण अर्ज माहिती भरून सर्व कागदपत्रांसहित बंद लिफाफ्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पश्चिम, नागुल बिल्डिंग, 1 ला मजला, डॉ घोरपडे हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहमदनगर 414001 या पत्त्यावर कार्यालयाच्या वेळेत स्वत: किंवा पोस्टाने दिलेल्या मुदतीत पाठवावा.


बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर शहर विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती 2023

महाराष्ट्र शासन, निर्णय नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर शहर या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अहमदनगर शहर आणि भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड भागातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यंत जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज मागवण्यात आलेले आहेत.अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्जाचा नमूना डाउनलोड करून घ्यावा व पूर्ण अर्ज माहिती भरून सर्व कागदपत्रांसहित बंद लिफाफ्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर शहर,वेदान्त कॉलनी,पहिला मजला, बागरोजा हडको, डॉ साताळकर हॉस्पिटल जवळ दिल्ली गेट अहमदनगर 414001 या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा पोस्टाने सांगितलेल्या मुदतीत पाठवावा.


बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पूर्व विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती 2023

महाराष्ट्र शासन, निर्णय नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पूर्व कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नेवासा, जामखेड,कर्जत, शेवगाव या भागातील नगर पालिका /नगर पंचायत अंगणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदे भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यंत जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज मागवण्यात आलेले आहेत. दिलेल्या जाहिरातीतील किंवा दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्जाचा नमूना डाउनलोड करून घ्यावा व पूर्ण अर्ज माहिती भरून सर्व कागदपत्रांसहित बंद लिफाफ्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर पूर्व , नागुल बिल्डिंग, 1 ला मजला, डॉ घोरपडे हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहमदनगर 414001 या पत्त्यावर कार्यालयाच्या वेळेत स्वत: किंवा पोस्टाने दिलेल्या मुदतीत पाठवावा.

  1. उमेदवार विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे.
  2. अनाथ असल्यास संबंधित विभागीय उप-आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे.
  3. मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्य प्रतिसह अर्ज करावा.
अनुभव :
  1. उमेदवारास एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. मान्यताप्राप्त खाजगी आणि स्वयंसेवी, अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. व या बाबतचा कुठलाही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र केले जाईल.

हे देखील वाचा

  1. पश्चिम रेल्वे विभाग महाराष्ट्र येथे Apprentice पदांची मेगा भरती
  2. वसई विरार महानगरपालिका भरती 2023

  • एक उमेदवाराने अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकच अर्ज करावा.
  • अर्जासोबत जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्र (दहावी,बारावी,पदव्युत्तर, डी एड, बी एड, MS-CIT इ ) जातीचे प्रमाणपत्र (स्वत:च्या नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा दाखला, अनाथ महिला असल्यास दाखला (अधिकृत जाहिरात वाचा) इ च्या सक्षम अधिकाऱ्याकडून साक्षणकीत केलेल्या प्रति जोडणे गरजेचे आहे. सर्व आवश्यक कागदपत्र जोडलेले नसल्यास त्या बद्दलचे गुण दिले जाणार नाहीत. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment