MAHA DES Recruitment 2023, MAHA DES Bharti 2023

MAHA DES Recruitment 2023, MAHA DES Bharti 2023

MAHA DES Recruitment 2023 / MAHA DES Bharti 2023

Directorate of Finance and Statistics, Mumbai / अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत नामनिर्देशित रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

खालील पदांसाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता, अतिरिक्त पात्रता. वय मर्यादा, अर्जाचा नमूना, तसेच अर्ज करण्याची पद्धत, अर्ज फी, आणि इतर माहिती सविस्तर दिलेली आहे. सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. ऑनलाइन अर्ज भरायचे असल्यामुळे माहिती भरताना अचूक भरावी. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. चुकीच्या भरलेल्या माहिती साठी संचालनालय जबाबदार नसेल.

या पदांसाठीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी च्या आधीन राहून च केली जाईल.


अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई MAHA DES Recruitment 2023

उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. ऑनलाइन अर्जात सविस्तर अचूक माहिती भरणे गरजेचे आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, व त्या पेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास, त्या पात्रतेची माहिती देणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर समान गुण मिळाले असल्यास गुणवत्ता क्रम ठरवण्यासाठी केला जातो. अर्जासोबत माहिती न दिल्यास व नंतर उमेदवाराने माहिती सांगितल्यास ती विचारात घेतली जाणार नाही. अर्ज भरताना माहिती अर्धवट राहिल्यास, खोटी माहिती दिल्यास, भरलेली माहिती व दिलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे यात तफावत जाणवल्यास अर्ज नाकारला जाईल व त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असेल.

एकूण रिक्त पद संख्या : 260 पदे

पदांची माहिती :

पदाचे नावएकूण जागा
सहायक संशोधन अधिकरी, गट – ब (अराज)39
सांख्यिकी सहायक, गट – क94
अन्वेषक, गट – क127
अटी :
 1. उमेदवार भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. त्याबाबत चे अधिवास प्रमाणपत्र (Domicile) सादर करणे गरजेचे आहे.
 2. मराठी भाषेबद्दल ज्ञान असणे महत्वाचे आहे.

शैक्षणिक पात्रता :

 1. पद 1 साठी :
  अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / बायोमेट्रो / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातून पदव्युत्तर पदवी.
  किंवा
  ब) कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी द्वितीय श्रेणी किंवा 45 % मार्कसहित पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (ISI) किंवा भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) किंवा शासन मान्य संस्थेतील जिच्या प्रवेशासाठी कमीत कमीत पात्रता पदवी आहे अशी संख्य शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
 2. पद 2 साठी :
  अ) मान्यता प्राप्त विद्यापीठ मधील गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयांमधून पदव्युत्तर पदवी
  किंवा
  ब) मान्यता प्राप्त विद्यापीठ मधील गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यांपैकी एक विषयची द्वितीय श्रेणी किंवा 45% मार्कसहित पदवी.
 3. पद 3 साठी :
  अ) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास असणे गरजेचे आहे.

संगणक पात्रतेसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

परीक्षा फी :

 1. खुला वर्ग : 1000/- रु
 2. मागास वर्ग : 900 /- रु
 1. परीक्षा फी ना परतावा असेल. कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
 2. माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलीही फी नाही.
 3. परीक्षा फी भरणे बंधन कारक आहे. न भरल्यास अर्ज अपात्र केला जाईल.
 4. मागासवर्ग उमेदवारास फी मध्ये सूट आहे ज्य कागदपत्र पडताळणी वेळी मागासवर्ग असल्याची कागदपत्रे न आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवणे किंवा उमेदवारी रद्द करणे ही कार्यवाही केली जाईल.

पगार :

 1. पद 1 साठी : 38,600 ते 1,22,800
 2. पद 2 साठी : 29,200 ते 92,300
 3. पद 3 साठी : 25,500 ते 81,100

वय मर्यादा : दिनांक 1 जुलै 2023 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे, ( 1 जुलै 2005 नंतर जन्म झालेला नसावा)

 1. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे पर्यंत (2 जुलै 1983 पूर्वी जन्म झालेला नसावा)
 2. मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे पर्यंत (2 जुलै 1978 पूर्वी जन्म झालेला नसावा )

(दोन्ही वर्गासाठी 2 वर्षे शिथिलता असेल, म्हणजे खुला प्रवर्ग 40 वर्षे आणि मागास प्रवर्ग 45 वर्ष पर्यंत मुदत असेल )

नोकरी ठिकाण : मुंबई

भरती अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 जुलै 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 ऑगस्ट 2023

अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे

हे देखील वाचा

पनवेल महानगरपालिका नवीन 377 पदांची भरती सुरू, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना

 1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
 2. अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
 3. अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
 4. अर्ज अंतिम तारखेच्या अगोदर भरणे आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2023 ही आहे.
 6. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा (ऑनलाइन अर्ज उद्यापासून सुरू होतील)

(अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन पद भरती 2023 या पर्याय,मध्ये जाऊन तिथे APPLY ONLINE या पर्याय वर क्लिक करा.)


अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय (DES) बद्दल माहिती

अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय (DES) ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख सांख्यिकी संस्था म्हणून कार्यरत आहे, जी मंत्रालयातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. डीईएस कार्यालयाचे अध्यक्ष श्री. विजय आहेर, प्रशासकीय इमारतीच्या 8 व्या मजल्यावर, मुंबई उपनगर जिल्हा, वांद्रे (पूर्व), जेथे डीईएसचे ईडीपी केंद्र मंत्रालयासमोर, मुंबईच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या 4 आणि 7 व्या मजल्यावर कार्यरत आहे.

संचालनालयाचे मुख्य कार्य म्हणजे अधिकृत आकडेवारी गोळा करणे, सर्वेक्षणे, जनगणना आणि टाईप स्टडीजद्वारे डेटा गोळा करणे ज्यासाठी अधिकृत आकडेवारी अपुरी आहे; अशा प्रकारे गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी; महत्त्वाच्या कार्यक्रमांचे मूल्यांकन करणे; नियमितपणे सांख्यिकीय प्रकाशने आणण्यासाठी; सांख्यिकी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे; राज्य सरकारच्या विविध विभागांमधील सांख्यिकी विभागांच्या कामात समन्वय साधणे आणि त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि राज्य सरकारला आर्थिक आणि सांख्यिकीय बाबींवर सल्ला देणे. राज्यातील प्रमुख सांख्यिकी कार्यालय या नात्याने संचालनालयाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सर्व सांख्यिकीय बाबींवर संपर्क म्हणून काम केले पाहिजे. या संचालनालयाद्वारे आणि शासनाच्या इतर विभागांद्वारे संकलित केलेल्या सांख्यिकीय माहितीची प्रक्रिया या संचालनालयाच्या इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग विभागात केली जाते.


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या नोकर भरती च्या जाहिराती सविस्तर व त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment