Matrimonial Incentives Scheme 2024, sarkari yojna 2024 in marathi

आज आपण अपंग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. अपंग व्यक्तींसाठी विवाह झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत काही अर्थ सहाय्य देण्यात येते, त्याबद्दल ची सर्व सविस्तर माहीत आज आपण जाणून घेणार आहोत. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून आपल्या आसपास असणाऱ्या अपंग व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. Matrimonial Incentives Scheme 2024, सरकारी योजना 2024, maharashtra sarkar yojna 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वैवाहिक प्रोत्साहन ही योजना सरकार च्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग ची योजना आहे. या योजनेत, अपंग व्यक्ति ने अपंग नसणाऱ्या व्यक्ति सोबत लग्न केल्यास, त्या जोडप्याला 50 हजार पर्यंत वैवाहिक प्रोत्साहन म्हणजेच आर्थिक सहाय्य दिले जाते. Matrimonial Incentives Scheme 2024

सर्व सरकारी योजनांची आणि नोकर भरतीच्या सर्व जाहिरातींची माहिती रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच या योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणकरून पात्र असलेल्या व्यक्तींना यांचा लाभ घेता येईल.


Matrimonial Incentives Scheme 2024, विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र

विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र 2024

ही योजना महाराष्ट्र सरकार कडून 100% अनुदानित आहे. पात्र असणाऱ्या जोडप्याला 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य खाली स्वरूपात दिले जाईल.

  1. 25 हजार रुपयाचे बचत प्रमाणपत्र
  2. 20 हजार रोख रक्कम
  3. 4500 घरगुती उपयुक्तता स्वरूपात
  4. विवाह प्रोत्साहन कार्यक्रम साठी उपस्थित राहावे त्यासाठी 500 रुपये

अर्ज करण्यासाठी पात्रता :

  1. अर्ज करणारा अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  2. कायमचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  3. अर्ज करणारी व्यक्ति दृष्टी अपंग, कमि दृशीत, श्रवणदोष, अस्थिव्यंग इत्यादि असणे गरजेचे आहे.
  4. 40% किंवा त्या पेक्षा अपंगाची टक्केवारी असणे महत्वाचे आहे
  5. अर्जदार असणाऱ्या व्यक्तीचे लग्न अपंग नसलेल्या व्यक्तीशी झालेले असणे गरजेचे आहे.

Matrimonial Incentives Scheme 2024 अर्ज प्रक्रिया :

  1. जिल्हा समाज कल्याण कार्यालय च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे. अर्जाच्या नमुन्याची हार्ड कॉपी संबंधित प्राधिकरणकडून मागवा.
  2. अर्ज करायच्या फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरा, पासपोर्ट फोटो, सही द्या. स्व प्रमाणित केलेल कागदपत्र जोडा.
  3. अचूक अर्ज भरल्याची खात्री करून आवश्यक कागदपत्र सहित जिल्हा समाज कल्याण कार्यालय मध्ये जमा करा.
  4. अर्ज जमा केल्यानंतर कार्यालयकडून अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्या.

सविस्तर माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.


इतर नोकरी जाहिराती

अकोला येथे बँक मध्ये नोकरीची संधी, क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.


District Social Welfare Office Scheme Document list आवश्यक कागदपत्र :

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट फोटो – 2 सही केलेले
  3. निवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र
  4. अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  5. बँक खात्याची माहिती
  6. वय पुरावा – जन्म प्रमाणपत्र / 10 वी 12 वी प्रमाणपत्र इत्यादि
  7. विवाह झाल्याचा पुरावा
  8. जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांना आवश्यक असलेले इतर कागदपत्र

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

Matrimonial Incentives Scheme 2024 FAQ

  1. जोडपे दोन्ही अपंग असणे गरजेचे आहे का ?
    नाही दोघांपैकी कोणीही एक अपंग असणे गरजेचे आहे.
  2. योजेनची मार्गदर्शक तत्वे कुठ मिळतील ?
    https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/disability-welfare?&Submit=Submit या लिंक वर तुम्हाला योजनेची मार्गदर्शक तत्वे मिळतील.
  3. विवाह प्रोत्साहन योजनेची रक्कम किती आहे ?
    या योजनेत 50 हजार एवढी रक्कम मिळेल.
  4. अपंग असण्याची टक्केवारी किती असावी ?
    अपंगत्वाची टक्केवारी 40% एवढी असणे गरजेचे आहे.