शासनाचा निर्णय : महाराष्ट्रातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक ज्यांच वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी भारतामधील तीर्थक्षेत्रांना जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024, sarkari yojana 2024, mukhamnatri yojana 2024, सरकारी योजना 2024, sarakri yojana maharashtra whatsapp group link
या योजनेची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे सविस्तर वाचा. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. या योजनेची माहिती इतरांना सुद्धा शेअर करा.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024
योजना : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
योजनेचा उद्देश :
माहराष्ट्रातील ज्येष्ठ लोकांना तीर्थ क्षेत्र यात्रा मोफत करून देणे
- या योजनेमध्ये भारत व राज्यातील मुख्य तीर्थ स्थळांचा समावेश असणार आहे. सदर यादीतील तीर्थ स्थळांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. योजनेच्या अंतर्गत या स्थळांपैकी एका स्थळासाठी या योजनेचा एक वेळा लाभ घेता येणार आहे. प्रती व्यक्ति 30,000 /- एवढी प्रवासाच्या खर्चाची मर्यादा असणार आहे.
लाभार्थी : 60 वर्ष त्याहून जास्त वय असलेले व्यक्ति
योजनेची पात्रता :
- व्यक्ति महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वय 60 वर्ष + त्यावरील वय असलेले आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा कमी असावे
मुख्यमंत्री तीर्थ योजनेसाठी कोण अपात्र असेल ?
- कुटुंबातील सदस्य करदाता असल्यास ते व्यक्ति अपात्र असतील
- कुटुंब सदस्य सरकारी विभागात कायमचे कर्मचारी आहेत किंवा निवृत्तीवेतन घेत आहे. ते अपात्र ठरतील.
- 2.50 लाख पर्यंत उत्पन्न असणारे आणि बाह्य यंत्रणेतून काम करणारे कर्मचारी, स्वयंसेवी आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील.
- इतर सूचना पाहण्यासाठी खाली दिलेली योजनेची पीडीएफ जाहिरात पहा
Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024 कागदपत्र :
- ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड / रेशन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र नसेल तर – 15 वर्ष अगोदर चे रेशन कार्ड / मतदान कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य असणार आहे.
- सक्षम अधिकाऱ्याचा वार्षिक उत्पन्न दाखला किंवा केशरी / पिवळे रेशनकार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकारातील फोटो
- जवळील नातेवाईकांचा मोबाइल नंबर
- अटी आणि शर्ती चे पालन करणार असल्याचे हमीपत्र
बी एस एफ मध्ये नोकरीची संधी, मुदतवाढ मिळाली, लगेच क्लिक करून जाहिरात पहा आणि अर्ज करा
युको बँक भरती 2024, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज कसा करावा :
- या योजनेचा अर्ज पोर्टल / अॅप किंवा सेतु मधून ऑनलाइन भरता येईल.
- स्वत: ऑनलाइन अर्ज भरता ये नसल्यास सेतु मध्ये स्वत जाऊन भरावा लागेल.
- अर्ज प्रक्रिया संपूर्ण विनामूल्य आहे.
- अर्जदार स्वत: समोर असणे गरजेचे आहे.
- नागरिकांनी अर्ज करायला जातान 1. रेशन कार्ड 2. स्वतचे आधार कार्ड सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.
या योजनेची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा. अधिक माहिती साठी खाली योजनेची खालील पीडीएफ वाचा.
योजनेची अधिकृत पीडीएफ | येथे क्लिक करून वाचा |