PMC Scholarship For Student, Sarkari Yojana 2024 Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असणाऱ्या 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्थ सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत. खाली दिलेली योजनेची माहिती सविस्तर वाचा. PMC Scholarship For Student, Sarkari Yojana 2024 Maharashtra, pune municipal corporation 2024-25, latest marathi yojana update 2024,

सदर योजनेची माहिती तुमच्या आसपासच्या लोकांना नक्की शेअर करा. जेणेकरून पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेच्या 2024-25 या वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सर्व योजनांच्या नवनवीन अपडेट साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

PMC Scholarship For Student

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक योजना व 12 वी पास साठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजनेच्या अंतर्गत पुढील शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

  1. भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक योजना
  2. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना

वरील दोन्ही योजना अंतर्गत लाभासाठी पात्रता :

  1. खुल्या वर्गात असणाऱ्या फेब्रुवारी – मार्च 2024 या वर्षासाठी 10 वी आणि 12 वी साठी 80% मार्क मिळालेले असणे गरजेचे आहे.
  2. पालिकेच्या शाळेमधील विद्यार्थी, रात्रीच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्ग विद्यार्थी यांस 70% मार्क मिळालेले असणे गरजेचे आहे.
  3. 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्या विद्यार्थ्याना, कचरा वेचणाऱ्या व बायो गॅस प्रकल्पात काम करणाऱ्या आणि तसेच कचऱ्याची संबंधित काम करत असणाऱ्या असंघटित कष्टकरी यांच्या मुलांना कमीत कमी 65% मार्क मिळालेले असणे गरजेचे आहे.
  4. ही योजना 10 किंवा 12 वी नंतर मान्यता असलेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांसाठीच आहे.

अधिक च्या माहिती साठी आणि अर्ज करण्यासाठी https://dbt.pmc.gov.in/ या वेबसाइट ला भेट द्या.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी फक्त 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आळलेली आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा