Sarthi Yojana Maharashtra 2024, सारथी योजना महाराष्ट्र मराठी

राज्यामधील लक्षित गटामधील शेतकरी / युवक / युवतींना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे प्रायोजित कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. Sarthi Yojana Maharashtra 2024, सारथी योजना महाराष्ट्र मराठी, sarthi-maharashtragov.in, sarthi pune scheme 2024-25, shetkari yojaan 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सारथी पुणे संचालक मंडळाच्या बैठकीच्या मान्य केलेल्या ठरावानुसार महाराष्ट्र राज्यातील मराठा – कुणबी / कुणबी – मराठा समाजाच्या शेतकरी / युवक / युवतींकडून 18 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Sarthi Yojana Maharashtra 2024

योजनेचे नाव :

सारथी शेतकरी मावळा कृषि कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशिक्षण वेळ आणि क्षमता :

  1. कृत्रिम रेतन 30 दिवसांचे निवासी प्रशिक्षण / 60 दिवसाचे कार्यानुभव प्रशिक्षण / 24 उमेदवारांची बॅच असेल.
  2. 1 दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षण – प्रत्येक तालुक्याचे 30 उमेदवार असतील.

प्रशिक्षणाचे स्थळ :

  1. एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी तालुक्याचे प्रमुख ठिकाण
  2. 30 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पुणे – पेठ नाशिक
  3. 60 दिवसाच्या कार्यानुभव प्रशिक्षणसाठी तालुक्याचे प्रमुख ठिकाण

प्रशिक्षण फी :

हे प्रशिक्षण सारथी पुणे तर्फे विनामूल्य असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सारथी स्पॉन्सरशिप :

  1. प्रशिक्षणार्थी फी सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण केंद्राला दिले जाते. 60 दिवसांच्या कार्यानुभव अनिवासी प्रशिक्षणासाठी महिन्याची शिष्यवृत्ती प्रशिक्षणार्थी च्या खात्यावर जमा करण्यात येईल.

वय :

  1. कमीत कमी 18 – 50 वर्ष

रेल्वे विभागात 11558 जागांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

लाभ घेण्यासाठी पात्रता :

  1. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रामधील मराठी,कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या प्रवर्गामधील असणे गरजेचे आहे.
  2. कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  3. अर्जदार या प्रशिक्षणासाठी कमीत कमी 10 वी पास असणे गरजेचे आहे.
  4. सारथी पुणे तर्फे राबविलेल्या उपक्रमांचा या आधी लाभ घेतलेला नसावा.

लागणारी महत्वाची कागदपत्र :

  1. जातीचा दाखला ( कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या साठी ) / शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखल ( मराठा या जाती साठी )
  2. नॉन क्रीमीलेयर दाखला / ई डब्ल्यू एस दाखला / 8 लाख पेक्षा जास्त उत्पन्न नसल्याचा तहसीलदार यांचा मागील वर्षाचा उत्पन्न दाखला
  3. आधार कार्ड / हमीपत्र / 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो / कोड ऑफ कंडक्ट चे हमी पत्र
  4. जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र
  5. बँक खात्याची माहीती

अपात्र होण्याची कारणे :

  1. अर्धवट कागदपत्र असणे किंवा दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर न करणे
  2. ऑनलाइन अर्ज करताना चुकीची किंवा अर्धवट माहिती भरणे
  3. हमीपत्रात दिललेय नियमाचे पालन न केल्यास निवड प्रक्रिया / आर्थिक सहाय्य निश्चित करण्याचा शेवटचा अधिकार सारथी पुणे च्या संचालकांकडे असेल.
  4. अर्ज नमूना www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे.
  5. अर्जाची लिंक खाली सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे.
  6. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 18 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  7. कागदपत्र ची हार्ड कॉपी सारथी संस्थेला अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या अंत पाठवायचे आहे.
  8. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

योजनेची जाहिरात : येथे क्लिक करा

योजनेच्या सविस्तर माहिती ची पीडीएफ : क्लिक करून पहा

योजना अर्ज करण्यासाठी लिंक : क्लिक करा