Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024, Sarkari Yojana 2024

आपण आज एक सरकारी योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. ही योजना एक विशेष अर्थ सहाय्य योजना आहे. दुर्बल घटकांसाठी ही योजना राबविली जाते. दुर्बल घटकामध्ये असणाऱ्या सर्व पात्र असलेल्या लोकांना या योजनेच्या अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते. Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024, Sarkari Yojana 2024, महिलांसाठी सरकारी योजना 2024, mahilansathi sarkari yojana 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सामाजिक न्याय विभाग मार्फत ही योजना राबविली जाते. या योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. तसेच सर्व योजनांच्या माहिती साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024

योजनेचा उद्देश :

समाजात असणाऱ्या दुर्बल घटक मध्ये मोडणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणे

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळणार :

  1. विधवा स्त्री
  2. दुर्धर आजारग्रस्त स्त्री
  3. दिव्यांग
  4. अनाथ
  5. परीत्यक्ता
  6. देव दासी
  7. अत्याचारीत स्त्री
  8. वेश्या व्यवसाय मधून मुक्त झालेली स्त्री
  9. तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या कुटुंबातील प्रमुखाची पत्नी
  10. 35 वर्षाच्या वरील विवाह न झालेली निराधार स्त्री
  11. इतर दुर्बल निराधार असलेले घटक

या योजनेसाठी लागणारी कागदपत्र :

  1. दिलेल्या नमुन्यामधील अर्ज
  2. वय दाखला – कमीत मी 18 ते 65 वर्षपर्यंत ( 18 पेक्षा कमी वय पालकांकडून लाभ )
  3. कमीत कमी 15 वर्षापासून महाराष्ट्र मध्ये रहिवासी असणे गरजेचे आहे.
  4. विधवा महिलांना अर्ज करण्यासाठी पतीच्या मृत्यूचा दाखला असणे गरजेचे.
  5. दिव्यांग – जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्व असल्याचा दाखला ( कमीत कमी 40% अपंगत्व असावे )
  6. अनाथ असल्याचा दाखला
  7. दुर्धर आजार असल्याचा दाखला
  8. उत्पन्न दाखला
  9. दिव्यांग – जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 50,000 /- रु
  10. इतर सर्व लाभार्थी साठी जास्तीत जास्त उत्पन्नाची मर्यादा 21,000 /- रु
  11. आधार कार्ड / रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / बँकेचे पासबुक झेरॉक्स / रहिवासी प्रमाणपत्र / अर्जदारचा फोटो
  12. अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर महिन्याला 1500 /- रु मिळणार

अपंग व्यक्तींसाठी मिळणार आर्थिक सहाय्य, लगेच क्लिक करून माहिती वाचा

संजय गांधी निराधार योजना अर्ज कसा करायचा ?

  1. तहसील कार्यालय किंवा सेतु केंद्र
  2. अधिकृत वेबसाइट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login